एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकावले २ सुवर्णपदक
मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील सुवर्णकन्या कुमारी सानिया पप्पू कंधारे हिने बांगलादेश या ठिकाणी होत असलेल्या दुसरी साऊथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत ढाका या ठिकाणी सानियाने भारतासाठी ५४ किलो गटात स्पोर्ट्स सॅम्बो स्पर्धेत सुवर्णपदक तर कोम्बेट सॅम्बो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहेत.
या स्पर्धेत बांगलादेश शुन्य तर भारत दहा असा स्पोर्ट्स सॅम्बो कुस्तीचा निकाल होता. तर कोम्बेट सॅम्बो मध्ये बांगलादेश ०२ भारत ०५ असा हा सामना रंगला होता. सानियाने दोन्ही गटात सुवर्णपदक मिळवून भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली आहे. तर गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र आणि देशाचे नाव रोशन केले आहे.
सानियाचे वडील पत्रकार पप्पू दत्तात्रय कंधारे यांनी सांगितले की, सानिया हि कदमवाक वस्ती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सॅम्बो असोसिएशन सचिव कुमार उघडे यांच्याकडे सराव करत असताना कुमार उघडे यांनी कसून सराव करुन घेतला होता आणि कष्टा विना फळ नाही हे मात्र तितकेच खरे आहे. सानियाने मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीची जाणीव ठेवून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. जो पर्यंत देशासाठी सुवर्णपदक देणार नाही तो पर्यंत डोक्यावर केस वाढू देणार नाही असे सानियाने शाळेत असताना मनाशी निरधार केला होता आणि तो तिने या स्पर्धेत पुर्ण केला आहे.
सरावा बरोबर खेळाडूंना खुराक देखील तितकाच महत्त्वाचा आहे. यामध्ये सानियाची आई कविता यांनी देखील तालमीतील वस्तादाप्रमाणे बारीक लक्ष ठेवून वेळेचे आणि खाण्याचे नियोजन केले होते. तर सानियाचा भाऊ प्रसन्न हा सुद्धा सोशल मीडियावर विविध प्रकारचे डाव पेच पाहून तिला मार्गदर्शन करत असे.
गावाकडील मंडळी सानियाची आजी शोभा चौधरी, मंदा कंधारे, आजोबा अंनतराव चौधरी, मामा अविनाश चौधरी- वैभव चौधरी, संतोष कोंडिबा चौधरी, मावशी सुवर्णा शेलार, सविता पारखी, गौरी राऊत, दिपाली शिर्के, संगिता दिक्षित, काका जयवंत शेलार, विलास पारखी, संदीप पारखी, हरिष मातेरे हे देखील तेवढीच काळजी घेऊन प्रोत्साहन देत असत.
सानिया हि महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. या संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षिका स्पोर्ट्स शिक्षिका मंगला शेंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच फिदाभाई कुरेशी पुरस्कारीत कबड्डी प्रशिक्षक भरत शिळीमकर यांचा देखील सानिया खेळाडू होण्यामध्ये सिंहांचा वाटा आहे. सानिया तशी कबड्डी खेळाडू आहे परंतु शालेय स्पर्धेत सहभागी होत असताना अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन केले आहे.
तसेच महाराष्ट्रभरातुन सानियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही प्रत्यक्ष भेटून तर काही जण सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.