पुणे I झुंज न्यूज : अन्न, पाणी, ऊर्जा या मानवाच्या गरजा वर अनेक वेळा समस्या जाणवते या समस्यांचे निराकरण करण्यासाठी “शेल” या संस्थेने एन एक्सपलोरर च्या माध्यमातून अनेक शाळांच्या मुलांना प्रशिक्षण दिले जाते.
मुले आपल्या नवीन संकल्पना घेऊन सादरीकरण करतात. नावीन्यपूर्ण विचार कौशल्य आणि प्रभावी सादरीकरण करण्यासाठी पाच राज्यातून सोळा शाळांची निवड करण्यात आली होती. या साठी 10 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे “चेंज मेकर्स मेकर ऑफ टुमारो” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूल च्या पूर्वा पगारे आणि श्रावणी रेपाळे या नववीच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम सादरीकरण केले आणि शाळेसाठी लॅपटॉप आणि अमेझॉन किडले रीडर जिंकून आणले.
या दोन्ही विद्यार्थिनींना एन एक्सपलोरर च्या सुचित्रा सोनवणे, रोहिणी खरे आणि शिक्षिका समिधा दळी यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक जगन सिरिल आणि संस्था संचालक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.