आमदार जगताप यांनी भर पत्रकार परिषदेत भाजपाचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना भरला दम
पिंपरी। झुंज न्यूज : अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, पाठीमगुन वार करु नका असा सज्जड दम चिंचवड विधानसभेच्या भाजपाच्या आमदार अश्विनीताई जगताप यांनी भाजपाचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना दिला. भर पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांसमोर हा प्रकार घडल्याने याची संपूर्ण शहरांत जोरदार चर्चा चालू झाली आहे.
अश्विनीताईंचा रुद्रावतार शंकर जगताप यांच्या गोटात खळबळ आमदार अश्विनीताईंचा पत्रकार परिषदेतील रुद्रावतार पाहून भाजपा च्या शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात खूप मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चर्चा अतिशय दबक्या अवाजात परंतू गंभिर्याने चालू झाली असून अनेक पदाधिकार्यांचे चेहरे पिवळे पडू लागले आहेत. काल पत्रकार परिषदेत बसताना अश्विनीताईंना एका बजूला खूर्ची ठेवण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके यांनी हेतुपुरस्सर हा प्रकार केल्याचे अश्विनीताईंना वाटल्याने त्यांनी नामदेव ढाके यांना सज्जड दम दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मिशन 45 च्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. येत्या 11 ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड दौर्यावर येणार आहेत. यातच मावळ लोकसभा प्रवास दौरा तसेच घर चलो अभियानाच्या निमित्ताने बावनकुळे पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे या दौर्याची माहिती देण्यासाठी शहर भाजपने पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेस आमदार आश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, शहाराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदि उपस्थित होते.
यासंदर्भात भाजपाच्या एका पदाधिकार्याने बोलताना सांगितले. नामदेव ढाके यांच्या कामाच्या पद्धतीवर आमदार अश्विनीताई अधिच नाराज आहेत. ते अंतर्गत कलह माजवतात असा त्यांच्यावर शिक्का बसला असून पक्षातील सक्षम व प्रभावी स्थानिक नगरसेवकांना ज्यांच्याकडे संपूर्ण पॅनल निवडुण आणण्याची क्षमता आहे अशांना डावलण्याचे व स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्याचे काम ढाके करतात असा आरोप पक्षातंर्गत केला जात आहे.
याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठांकडून आलेल्या सुचना सर्व संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम सरचिटणीसांचे असताना ते आ. अश्विनीताईंना किंमत देत नाहीत असाही ठपका नामदेव ढाके यांच्यावर असल्याने ही सर्व नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेत काढली असल्याची भाजपाचे गोटात चर्चा सुरु आहे.