पुणे I झुंज न्यूज : रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत..कास पठार येथे नुकतीच नक्षञ कासपठार काव्यसहल संपन्न झाली.विविध सजलेल्या फुलांच्या सानिध्यात भटकंती करण्यात आली. परिसरातील तलाव, हिरवेगार डोंगर,अनेक धरणांचे अभांग पाणी, रिमझिम पाऊसधारा, अतिशय सुंदर हिरवीगर्द झाडी, अनेक रंगीबेरींग फुलांची पखरणीने कासपठार फुलेले कवी कवयिञींनी अनुभवले. आणि त्या सृष्टीसौदर्यांने नटलेल्या परिसरात आपली गाणी, शेरोशायरी, कवितांनी या काव्यसहलीत आनंद भरला.
कास पठार-अदभूत दुनियेत जाऊन नक्षञांची मने आनंदाने फुलेलेली दिसली.निसर्ग आपला सखा आहे.या भावनेने सर्व नक्षञ या काव्यसहलीत सहभागी होऊन आनंद लुटतांना दिसली. जागतिक दर्जा प्राप्त झालेले हे कास पठार आहे. हा सुंदर फुलांचा परिसर व नैसर्गिक वारसा लाभलेले सौदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. पाऊस सरी..चवर, पंद,आमरी,सोनकी, तेरडा ,गेंद, टुथब्रश, निलिमा आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या फूलु लागल्या आहेत.निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले मनमोहक कास पठार अनुभवत सर्व नक्षञ आनंदाने बेभान होऊन जीवनाचा खरा आनंद लुटत होती.
या काव्य सहलीला मार्गदर्शन करण्यासाठी कासपठार पर्यटन कायदेसल्लागार अॅड संजय माने हे उपस्थित होते. या कास पठार नक्षञ काव्यसहलीचे उत्तम नियोजन संयोजन कवी वादळकार,पुणे प्रा.राजेंद्र सोनवणे (राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच)केले.विशेष संयोजनात अण्णा जोगदंड,सुभाष चव्हाण,अंजू सोनवणे इ.पुढाकार घेतला.यापुर्वी अनेक काव्यसहलीचे आयोजन व संपन्न केलेले आहे.कवींना आदर व सन्मान मिळावा.त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन संस्था गेली २४ वर्षे कार्यकरत आहे.
स्थानिक स्थळांना भेटी देत. या फुलांच्या दुनियेच्या काव्यसहलीत सहभागी झालेले नक्षञ प्रा.शंकर घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, प्रा.दिलीप गोरे, सौ.दिव्या भोसले,अशोक पांढरकर, सौ.शिला भुजबळ,अविनाश खेडकर,अंजू सोनवणे,बाळासाहेब पोळ,सौ.प्रीती सोनवणे, एम.डी.चौधरी, सौ.सुवर्णा मुटके,सौ.जयश्री बनकर,अॅड,.सुनिल लोंढे, स्निधा बॅर्नजी, सौ.वैशाली आवताडे,कवी वादळकार, अॅड.संजय माने, सौ.संगिता जोगदंड,सौ.मीना घोरपडे, कु.पूजा आवतडे,सौ.सुनंदा चव्हाण,सौ.चंद्रकला पोळ, कु.प्राजक्ता पोळ,चि.साईराजे सोनवणे,श्रीकांत जाधव,सौ.नंदा चौधरी, सौ.अमिता गोरे,सौ.श्रध्दा बागडे,सौ.कल्पना मुटके,सौ.सुमन मुटके,सौ.चंदना गायकवाड इ.कवी,कवयिञी,रसिक पर्यटकांनी कासपठार नक्षञ काव्यसहलीत सहभाग घेतला.उत्तम नियोजन नक्षञाचं देणं काव्यमंच व साईराजे टूर्स हाॅलिडेज,पुणे यांनी केल्यामुळे या काव्यसहलीचा पुरेपुर आनंद मिळाला.
यावेळी काव्यसहली मध्ये सुप्रसिदध माऊंथ आॅर्नरकार एम.डी.चौधरी यांनी अनेक सुंदर गीतांचे मांऊथ आॅरगनवर वादन करुन मने जिंकली,चि.साईराजे सोनवणे यांनी गिटार वादन करुन विविध सुंदर गाणे गिटारवर वाजवून सर्वांना आनंद दिला.कविवर्य अणणा जोगदंड, कविवर्य सुभाष चव्हाण,कविवर्या सौ.दिव्या भोसले,कविवर्य अशोक पांढरकर,कविवर्य शंकर घोरपडे,कविवर्या सौ.जयश्री बनकर,सौ.प्रीती सोनवणे,कविवर्य अविनाश खेडकर,स्निगधा बर्नजी,कविवर्य रामचंद्र पंडीत,यांनी सुंदर काव्यसादर करुन मैफलमध्ये बहार आणली.
सर्व नक्षञ दिवसभर निसर्गाचा आनंद घेत,फुलांचा सुगंध मनात दरवळत ठेवून,मनात आठवणीत साठवत परतीच्या प्रवास करुन आनंदी मनाने सुरक्षित घरी पोहचले आणि या कासपठार सहलीचा आनंद घेतला.