विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम
पुणे I झुंज न्यूज : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे कवी लेखक आपल्या भेटीला “एक तास कवितेचा” हा उपक्रम घेण्यात आला. नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय संस्थापक प्रा. राजेंद्र सोनवणे (कवी वादळकार,पुणे)यांनी कवी लेखक कसे घडतात. त्याचा अनुभव सांगितला. तसेच मुलांना आपल्या बाल कवितांमधून मंत्रमुग्ध केले . विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांना खाऊ भेट दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले.
यावेळी कवी वादळकार म्हणाले,” आपल्याला कवी फक्त पुस्तकातच भेटले. पण कवी कसा असतो. कसा दिसतो. स्वत:च्या लेखन केलेल्या कविता कशा सादर करतो. हा अनुभव या कार्यक्रमातून विद्यार्थी वर्गाला मिळाला पाहीजे. त्याची अनुभूती त्यांना मिळण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कविता हि निरीक्षणातून निर्माण होते. सभोवताली दिसणा-यांना घटनांना कवितांमध्ये मांडता आले पाहीजे. कवितेचा स्पर्श झालेल्यांना जीवनात चैतन्य येते. भविष्यात विद्यार्थी वर्गातून कवी घडावे. हाच आमच्या नक्षञाचं देणं काव्यमंचचा प्रयत्न आहे.”
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलमभाई इनामदार उपस्थित होते. श्याम लोलोपोड सर यांनी प्रास्तवना केली. मुख्याध्यापक कविवर्य यशवंत घोडे सर यांनी आभार मानले होते. सर्व विद्यार्थी वर्गाने कवितेचा आनंद घेतला.त्यांच्या चेह-यावर आनंदाची चमक दिसत होती. कवी वादळकार,पुणे यांचा विद्यालयाच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.