५१ शिक्षक आणि १० शाळांना प्रेरणा पुरस्कार
चिंचवड I झुंज न्यूज : भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान शिक्षकांना दिले जाते. आई बाळाला जन्म देते, पण त्या बाळाला संस्कारक्षम बनवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकाला पार पाडावी लागते. शिक्षणाचा विचार माणूस घडविण्याचा आहे आणि ते काम फक्त शिक्षक करू शकतात. जे शिक्षण मानवाचे माणसात रूपांतर करते ते खरे शिक्षण. जीवनात आनंदाच्या वाटा ज्यातून निर्माण होतात ते खरे शिक्षण, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.ते प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन व प्रेरणा बँक आयोजित गदिमा नाट्यगृह येथे आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर होते.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन सुरेश पारखी, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड अजितकुमार जाधव,राजेंद्र शिरसाट, सुजाता पारखी, प्रेरणा शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शालिनी गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, किरण शेळके व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यजुर्वेंद्र महाजन पुढे म्हणाले, फक्त विद्यार्थी घडवणं किंवा माणूस घडवणं हे खरं शिक्षण नसून चांगला माणूस घडवणं हे शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे. आपल्या जीवनातली सर्वात चांगली गोष्ट हीच आहे की आपण माणूस म्हणून जन्माला आलो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सर्वात आधी येणारी पहिली व्यक्ती म्हणजे त्याची आई असते. मातेच्या स्तरावर जाऊन जो विद्यार्थ्यांवर प्रेम करत प्रेम करतो, त्यांना घडवतो तोच खरा मास्तर. यजुर्वेंद्र महाजन सर बोलत असताना सभागृहातील सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.
चेअरमन कांतीलाल गुजर म्हणाले, राष्ट्रातील कोणतीही व्यक्ती ही शिक्षकाशिवाय अपूर्ण आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांची जडणघडण ही शिक्षकांच्या हातामध्ये असते त्यामुळे शिक्षक खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे महत्त्वाचे घटक असतात. यावेळी चेअरमन यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी विशेष कर्ज योजना जाहीर केली. शिवाय प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल यासाठी योगदान म्हणून इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी यासाठी योजना जाहीर केली.
श्रीधर वाल्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. गौतम दळवी यांनी सूत्रसंचालन केले. आभार व्हाईस चेअरमन सुरेश पारखी यांनी मानले.
शाळा : श्री. सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी, चऱ्होली, प्रेरणा प्राथमिक विद्यामंदिर, लक्ष्मणनगर, थेरगाव, जिजामाता माध्यमिक विद्यालय भोसरी, नृसिंह हायस्कूल, सांगवी, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, आंबेगाव, ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा, धायरी, नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी, विद्या विनय निकेतन विद्यालय, पिंपळे निलख, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय रुपीनगर, शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, मोहन नगर,
शिक्षक गौरव : धनसिंग साबळे, मनोज देवळेकर, सोमनाथ भंडारे, विलास खाडे, सुभाष वाल्हेकर,मोहन वाघुले, कैलास पवळे, विक्रम काळे, डॉ. नंदा भोर, अशोक थोरात, नवनाथ तोत्रे, संजीव वाखारे, अशोक जाधव, हनुमंत मारकड, विद्याराणी वाल्हेकर, राजकुमार सरोदे, बाबाजी शिंदे, बाळासाहेब साबळे, करुणेश त्रिपाठी, सूर्यकांत मुंगसे, सुनिल सोनवणे, नटराज जगताप, स्मिता धाईंजे, सरिता विधाते, वासंती तिकोणे, सीमा खताळ, लालासाहेब जगदाळे, बाजीराव राक्षे, योगिता बनकर, शिवाजी माने, मीना म्हस्के, पांडूरंग दिवटे, राजेंद्र देशमुख, जयमाला बेदरकर, प्रमोद जगताप, संतोष काळे,आल्हाट सी.आर., दत्तात्रेय धराडे, सविता लबडे, मिलिंद संधान, अरुणा पारगे, लतीफ शेख, रामदास रेटवडे, नाना खेडेकर,भारती फुगे, मंगल पानसकर, शिवाजी अंबिके, दयानंद गरगडे, संगिता खोत, सुप्रिया पवार, आशा गायकवाड, सावकार येवले.