शिरूर I झुंज न्यूज : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरकेवाडी कासारी माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आनिता चंद्रकांत कोकडे मॅडम यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला.
नरकेवाडी शाळेमध्ये बारा वर्ष शैक्षणिक सेवा दिल्या बद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ भुमकर कासारी गावचे माजी उपसरपंच किरण रासकर, गोपाळ भुजबळ, विष्णुपंत नरके, हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ह.भ.प.बापु साहेब नरके, श्री नवनाथ भुजबळ, माजी विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ नरकेवाडी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनात पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री नवनाथ भुजबळ यांस कडून जिल्हा परिषद शाळेसाठी एक टेबल व दहा खुर्चा भेटवस्तू देण्यात येणार आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भरत दौंडकर सरांनी केले .यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपली भावना व्यक्त केली .
या प्रसंगी विकास भाऊ नरके प्रदेश उपाध्यक्ष सावता सेना महाराष्ट्र राज्य नवनाथ नरके ज्ञानेश्वर नरके माजी विद्यार्थी रोशन नरके अदित्य नरके रोहन नरके आदी अनेक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.