पुणे I झुंज न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UGC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या MPSC आणि UPSC प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना, नियमानुसार वसतिगृहाची सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन द्यायला तयार नव्हते.
यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतनकुमार पाटील, पुणे शहराध्यक्ष विक्रम जाधव व इतर सहकारी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते. या संदर्भात काल विद्यापीठाचे कुलगुरू श्री. सुरेश गोसावी सर यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली होती.
या आंदोलनास यश प्राप्त झाले, विद्यार्थ्यांची CEC हॅास्टेल संदर्भातील मागणी विद्यापीठ प्रशासनाने मान्य केली . या निर्णयानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल कुलगुरू सरांचे आभार व्यक्त केले.