पुणे I झुंज न्यूज : नक्षञाचं देणं काव्यमंच व सहारा वृध्दाश्रम,कुसवली,मावळ वतीने श्रावण महिन्यातील विशेष “नक्षञ बहारदार काव्यमैफल” आयोजित करण्यात आली. सहारा वृध्दाश्रमातील आजी -आजोबांसाठी नक्षञ कविंनी आपल्या काव्यातुन कवितेतून आनंद दिला.
जंगल, डोंगर -झाडी, धबधबे अशी निसर्गदत्त देणगी लाभलेल्या आंदर मावळ मधील कुसवली या आदिवासी गावात या नक्षञ बहारदार काव्य मैफलमध्ये विविधविषयांना स्पर्श करणा-या कवितांचे सादरीकरण झाले. विनोदी, विडंबन, प्रेम, हास्य, जीवन, देश, सामाजिक, जीवन, आई, निसर्ग, माणुसकी, आनंद, पाऊस इ.विषयांवर रचना सादरीकरुन आजी आजोबांना आनंद देण्याचा प्रयत्न केला गेला.
‘नक्षत्राचं देणं काव्यमंचा’ मुख्यालय,भोसरी,पुणे तर्फे हि विशेष काव्य मैफल संपन्न झाली. असून कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमाच्या प्रांगणात हा सोहळा रंगला.स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन निसर्गरम्य वातावरणात रिमझिम पाऊसधारा झेलत,परिसरातील धबधध्याच्या मंजुळ आवाजात काव्यमैफलने आनंदाचा रंग भरला.
यात कवी वादळकार, मावळ तालुका अध्यक्ष कविवर्य दिलीप विधाटे, पोलीस कवी विनायक विधाटे, कवी आनंद मुळूक,मोहन कुदळे,रामदास हिंगे,सौ.प्रीती सोनवणे, सौ.राजश्री कुदळे, अंकुश जगताप आणि आजी-आजोबांनी सहभाग घेतला.
सध्या मावळातील डोंगरकपारी भागात संततधार पाऊस सुरू असून या जलधारांच्या साक्षीने काव्याची एक दिवसीय बरसात आयोजित करण्यात आली होती.सहारा वृध्दाश्रमाचा विलोभनीय परिसर असून वृध्दाश्रमाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली होती.. यामध्ये सहभागी होण्या-या सर्व कवी कवयिञींना सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. आपल्या काव्याच्या माध्यमातून कवी आजी-आजोबांना आनंद देणा-या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
या काव्यमैफलतून सामाजिक भान जागविणाच्यादृष्टीने प्रा. राजेंद्र सोनवणे व समाजसेवक विजय जगताप यांनी संयोजन केलेले होते. नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने आजोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सांगता विश्वगीत पसायदानाने करण्यात आली.