-कवी : रहेमान पठाण
वाकड, पुणे
मो. 8888724960
आता थोडी रम घ्यावी म्हणतो
चकण्या सोबत गम चाखावा म्हणतो
संडे सॅटरडेचा बहाणा उगा कशाला सांगू
रोज एकदा गच्चीवर बसावं म्हणतो
टल्लं होऊन एकदा होऊ जगाचे शेर
बकरीचं जिणं आता सोडावं म्हणतो
घरावर तुळशीपत्र ठेऊन मी स्वतःला बरबाद केले
हे आमच्याच माना मुरगाळून तालीवार झाले
घेतले अनेक झेंडे केल्या अनेक दंगली
कार्यकर्त्याचा हा वेश त्यागून खादी मी घालावी म्हणतो
विकला यांनी बळीराजा अन् फुलविले भांडवलदारांचे मळे
जय जवान जय किसान घोषणा कशाकरिता जाब यांना विचारावा म्हणतो
मोठे झाले बंगले यांचे पण देशाला यांनी कंगाल केले
उतरून एकदा मैदानात समोरासमोर लढावं म्हणतो
उद्याचे आधारस्तंभ म्हनून आज यांनी मला बेरोजगार केले
ध्यानात राहावा हा दिवस म्हणून एकदा डिपॉझिट यांचं जप्त करावं म्हणतो
बाहेरून यांचा आतून त्यांचा पाठिंबा हा हमखास असतो
आम्ही मेलो डाव्या उजव्यातच म्हणून एकदा यांना “मधला” करावा म्हणतो
सगळ्यांनाच चढली अफूची नशा त्यांचे खोटे यांनी खरे केले
लाज वाटते सुशिक्षित असल्याची म्हणून एकदा स्वतःवरच वार करावा म्हणतो