भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार – आमदार अश्विनी जगताप
पिंपरी I झुंज न्यूज : भारतीय जनता पार्टी जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतू भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार आहे हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श समोर ठेवून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेश नुसार, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात ‘मोदी@9’ या अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारचे मागील नऊ वर्षातील काम पोहचविण्यात आले आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे सरकार आणण्याचा निर्धार देशवासीयांनी केला आहे. त्यामध्ये चिंचवड भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केले.
बुधवारी (दि. २८) जूनी सांगवी येथे भाजपा चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ‘टिफिन बैठक आ. अश्विनी जगताप यांनी आयोजित केली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. जगताप बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात ‘महा-जनसंपर्क ‘मोदी@9’ हे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत येणारे सर्व कार्यक्रम जून महिन्यात प्रभावीपणे चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या सर्व अभियान व कार्यक्रमात विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यातील शेवटच्या टप्प्यातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘टिफिन बैठक’ होती. यावेळी चिंचवड मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पक्षाचे प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख यांनी ‘टिफीन बैठक’ मध्ये सहभाग घेतला होता.
देशभरातील पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व सर्व लोक प्रतिनिधी कार्यकर्त्यांसमवेत टिफीन बैठकीत सहभागी होतात, हे संघटनेतील सर्व घटकांसाठी प्रेरणा देणारे आहे. या बैठकीच्या संकल्पनेनुसार आपल्या घरुन जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन केले जाते आणि पक्षाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी मोदी@9 चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी यावेळी दिली.
या बैठकीत माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, बाळासाहेब ओव्हाळ, संतोष कांबळे, शेखर ओव्हाळ, सुरेश भोईर, माजी नगरसेविका उषा मुंढे, आरती चौंधे, संगिता भोंडवे, निर्मला कुटे, अश्विनी चिंचवडे, शारदा सोनावणे, ज्योती भारती, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ तसेच जवाहर ढोरे, अजित कुलथे, मधुकर बच्चे, संतोष ढोरे, जयदेव डेब्रा, हिरेन सोनावणे, रणजीत कलाटे, गणेश कस्पटे, संजय मराठे व चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवक, पक्षाचे प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी आणि सर्व शक्तीकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले व त्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला. प्रास्ताविक ॲड. मोरेश्वर शेडगे, आभार हर्षल ढोरे यांनी मानले.