पिंपरी I झुंज न्यूज : उच्च न्यायालयाच्या दिलासाने पूर्ण स्थापित झालेले पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मधील पिंपळे सौदागर परिसरातील पुरस्कार प्राप्त रोझलँड रेसिडेन्सीच्या चेअरमन सह इतर संचालकांचा निवडणुकीत दारुण पराभव करत परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय झाला.
रोझलँड रेसिडेन्सी ही एक उच्चभ्रू आणि प्रथितयश सहकारी गृह रचना संस्था म्हणून ओळखली जाते. सोसायटीमध्ये आर्थिक व्यवहार व इतर काही कारणामुळे सभासदांनी केलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकाने सोसायटीचे माजी चेअरमन संतोष म्हसकर सेक्रेटरी आणि इतर संचालक मंडळास पाच वर्षासाठी अपात्र घोषित केले होते. सदर मंडळानी बचावासाठी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून लोकशाही विचारात घेता अवघ्या पंधरा दिवसात सोसायटीची निवडणूक लक्षात घेऊन सदर निर्णयास स्थगिती दिली.
पंधरा दिवसांसाठी संचालक मंडळ पूर्ण प्रस्थापित झाले पण काळास ते मान्य नव्हते. रविवार दिनांक 25 जून रोजी झालेल्या निवडणुकीत सोसायटीतील सभासदांनी त्यांना साफ नाकारले. 75 ते 80 टक्के मतदान घेऊन परिवर्तन पॅनलचे 17 उमेदवार निवडणुकीतून आणि 1 बिनविरोध असे 18 आणि रोझलँड रेसिडेन्सी पॅनल चा 1 बिनविरोध असे एकूण 19 उमेदवार विजयी झाले.
यावेळी 382 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी सात वाजता जाहीर झालेल्या निकालानंतर सोसायटीतील सर्व विजयी उमेदवारांनी आणि रहिवाशांनी प्रथम सोसायटीतील राधाकृष्ण मंदिर आणि श्री हनुमान मंदिर यांचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर सोसायटीतील सर्व सभासद रहिवाशी महिला मुलांनी फटाके डीजे गुलाल भंडारा उडवून पेढे बर्फी वाटून दिवाळी साजरी केल्यासारखा जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या प्रक्रिये दरम्यान संदीप जाधव, चंदन चौरसिया आणि विशाल मारणे यांसह सभासद युवाशक्ती यांनी मोहिमेचे नेतृत्व केले आणि संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सगळ्यांना एकत्र केले.
या विजयानंतर शंकर शेठ जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे, निर्मला संजय कुटे, प्रभाकर वाघेरे, संजय भीसे, ऋषिकेश संजोग वाघेरे (पाटील), बाळासाहेब वाघेरे, नंदकुमार काटे, संजय भिसे, गोविंद काटे, शंकर काटे, कैलास कुंजीर, संभाजी वाघेरे, गिरीश जाचक यांसह विविध मान्यवरांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना भेटून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रोझलँड रेसिडेन्सी चे स्टाफ आणि तरुण पिढी, सुधांशू जाधव, ओम पाटील, सौरिश सक्सेना आणि हृदय सोनैया यांनी मतदान प्रक्रियेसाठी रहिवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात मोलाचा वाटा उचलला. परिवर्तन पॅनेलने गेल्या काही दिवसांपासून अथक प्रयत्न केले होते.
विजयी उमेदवार : विजय मारणे, संदीप ठेंगे, नरेंद्र आहिरे, सखाराम देशपांडे, प्रशांत पाटील, सुनंदा गवळी, डॉ. वर्षा घाळी, तेजसकुमार मिस्त्री, पंकज पांधी, राजीव रंजन प्रसाद, विनीत सक्सेना, विक्रम शिंदे, हरी श्रीवास्तव, किशोर सोनय्या, बबिता बॅनर्जी, वैशाली मकरंद देशपांडे, महेश चौधरी, निखिलेश पुंडे, मिथुन गोडबोले.