पिंपरी : संपूर्ण शहरावर कोविड १९ चे संकट आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत झाली पाहिजे. त्यातच कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता त्यांना उपचार देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी थेरगाव येथील महापालिकेच्या नवीन रुग्णालायची नुकतीच पाहणी केली.
यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्षा नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, शहर अभियंता राजन पाटील उपस्थित होते.
“थेरगाव गावठाण येथे महापालिकेच्या नवीन रुग्णालयाच्या प्रशस्त चार मजली इमारतीचे काम सुरु आहे. रुग्णालयाचे इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी २०० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरामध्ये प्रलंबित काम मार्गी लावून लवकरात लवकर कोविड सेंटर कसे तयार करता येईल. त्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचे सांगण्यात आले.”