शिरूर I झुंज न्यूज : पुणे जिल्हाचे आरोग्यदुत जयेशदादा शिंदे (भाजपा अध्यक्ष कामगार आघाडी पुणे जिल्हा) यांनी तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी असलेले अगदी गरीब कुटुंब निकमवाड यांना जयेशदादा शिंदे यांना मदतीचा हातभार दिला.
कोरोणा महारोगामुळे तसेच अपघातात व इतर कारणामुळे मृत पावलेल्या गरीब कुटुंबातील छत्र हरपलेल्या मुलांना मदत करण्याचा जयेशदादा शिंदे यांचा नेहमीच मदतीचा हात आसतो , शिरसगाव काटा, येथील गरीब कुटुंबाच्या झोपडीला आग लागुन सर्व संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले तेथे पण कोणत्या अधिकार्यांची, पदधिकाऱ्याची मदत मिळाली नाही, सकटांच्या काळात खंबीरपणे उभा राहणारा पुणे जिल्हाचा आरोग्यदूत जयेशदादा शिंदे अहमदाबाद ता शिरूर येथील अपघातातील कुटुंब आसो, तादंळी येथील लहान मुलीचा पुणे येथील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून तेथे सुद्धा दादांचा मदतीचा हात असे अनेक कुटुंबांना मदत करणारे जयेश शिंदे यांनी तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी असलेले निकमवाड कुटुंबातील छत्र हरपलेले मंदिता व महेश निकमवाड या दोन्ही विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य दिले आले.
दोन्ही मुले शिक्षणामध्ये मध्ये खूप हुशार आहेत , तसेच इथुन पुढेही सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले समाजात या संदर्भातील खुप अडचणी येतात इतरही सहकाऱ्यांनी पुढे येऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणून शैक्षणिक मदत करणे ,या विद्यार्थ्यांचे भविष्य घडु शकेल असे शिंदे यांनी सांगितले.