शब्दांकन :
मुळशी तालुका प्रतिनिधी
पप्पू दत्तात्रय कंधारे
(प्रदेश सचिव : अ. भा. ग्रामीण पत्रकार संघ)
मोबा : ९७६५४५५०११
pappud.kandhare@gmail.com
“मुळशी तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक… मुळशी तालुक्यातील जनतेच्या मनावर राज्य करणारे एक जनमान्य नेतृत्व म्हटले तर आवर्जून नाव घ्यावे असे रविंद्र उर्फ बाबा कंधारे. तळागाळात पोहोचून जनतेच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून मुळशी तालुक्यात परिचय असलेले मुळशी तालुक्याचे माजी सभापती बाबा उर्फ रवींद्र कंधारे आपल्या स्वभावाने व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच ठसा उमटवतात. शिवाय राजकारणाबरोबरच ते आपल्या शरीर स्वास्थ्याकडे आवर्जून लक्ष देतात. ही बाब आजच्या युवकांना नक्कीच खूप प्रेरणादायी आहे.
ते सांगतात, “त्यांना पैलवानकीचा व राजकारणाचा वारसा हा त्यांच्या आजोबांकडून मिळाला आहे. वडील-चुलते यांचं वैचारिक पाठबळ, आजी व आईची शिकवण तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांची साथ त्यांच्या आयुष्यात तेवढीच महत्त्वाची ठरली आहे.”
राजकारण आणि समाजकारण करत असताना स्वतःच्या शरीराकडे देखील विशेष लक्ष देणारे आणि एकाच वेळी तीनशेहून अधिक सूर्यनमस्कार घालणाऱ्या बाबा उर्फ रवींद्र राजाराम कंधारे यांनी व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांनी यातून नवतरुण पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे. चांगल्या आरोग्यासाठी व उत्तम मनस्थितीसाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येकाने दररोज एक तास तरी व्यायाम करायला हवा असा मोलाचा सल्ला बाबा कंधारे यांनी दिला आहे .
प्रत्येक राजकीय व्यक्तींना वेळेचे कसलेच बंधन नसते. अहोरात्र या ना त्या कामामुळे स्वतःकडे मात्र कायम दुर्लक्ष होत असते. कामाच्या व्यापात वेळेवर जेवण नाही, जीवाला आराम नाही, यामुळे अनेक राजकीय व्यक्तींना विविध व्याधींना सामोरे जावे लागते. परंतु त्याला मात्र बाबा कंधारे अपवाद ठरत आहेत. समाजकारण आणि राजकारणात सोबत व्यायामाला देखील तेवढेच प्राधान्य देणारे बाबा तरुणांना देखील लाजवतील असा व्यायाम करत आहेत. स्वतः पैलवान असल्याने अगदी लहानपणापासून त्यांना व्यायामाची प्रचंड आवड आहे आणि ती त्यांनी आजही प्राधान्याने जपली आहे हे विशेष. नेहमीचा व्यायाम, सकस व पोषक आहार आणि सायकलिंग यामुळे त्यांची तब्येत एकदम तंदुरुस्त आहे.
त्यांचा बोलका स्वभावही सर्वांना आपलासा करून टाकणारा, दूरदृष्टी तसेच कायम कामाबाबत तत्परता यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रात चांगला ठसा आहे. “बाबा” या नावाप्रमाणेच ते सर्वांशी आपुलकीने चांगले वागतात, त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. एकदा एखादी व्यक्ती त्यांना भेटली की ती व्यक्ती कायमस्वरूपी त्यांची झाली, यात शंका नाही. बाबा हे असे व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणतेही पद नसताना जनतेचं काम मनापासून करत असतात व प्रसिद्धीपासून अलिप्त राहतात.
बाबांच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वात उजवी गोष्ट म्हणजे ते एक चांगले कुस्तीगीर आहेत. आजही ते रोज दीड तास न चुकता व्यायाम करतात. शिवाय त्यांना ट्रेकिंगचीही त्यांना विशेष आवड आहे. याशिवाय ते पुण्यातील सुप्रसिद्ध कुंजीर तालमीचे प्रमुख असून तालुक्यातील गरजूंना ते आर्थिक मदतही करत असतात.
त्यांना त्यांच्या आजोबांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा कोंढावळे गावचे सरपंच व मुळशी तालुका पंचायत समिती सदस्य आणि मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते. आजोबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज बाबा आपल्या कार्याचा तसा उच्चांकी आहेत.
बाबा कोंढावळे गावचे १९९७ ते २००२ पर्यंत उपसरपंच २००२ ते २००७ सरपंच पदावर कार्यरत होते. या पदावर त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना २००७ ला मुळशी तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष पदही मिळाले होते. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी तालुक्यात संघाचे कार्यालय बांधले की जे हे काम जिल्ह्यामध्ये प्रथमच झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती विषयाचे अनेक अडचणी सुटल्या.
या उल्लेखनीय कामामुळे २०१२ मध्ये आदरणीय अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे त्यांना पंचायत समितीचे उमेदवारी दिली. अत्यंत दुर्गम अशा आंबवणे गणामध्ये त्यांनी विजय संपादन करून पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या कालावधीत त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला भुषण ठरेल असा जिल्ह्यातील पहिला व महाराष्ट्रातील तिसरा हागणदारीमुक्त मुळशी तालुका करून मुळशीचे नाव उंचावले.
मुळशी पंचायत समितीच्या ६० वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र राज्य शासनाचे दोन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले सभापती म्हणून त्यांचा लौकिक आहे. मुळशी तालुका हागणदारीमुक्त यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले आहे. सभापती झाल्यावर त्यांनी पण केला होता की जोपर्यंत संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त होत नाही तोपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नाही आणि तो त्यांनी खरा करूनही दाखवला आहे.
आज तालुक्यातील नागरिक पीएमपीएलच्या बसने मुळशी तालुक्यामध्ये प्रवास करतात. मुबलक प्रमाणात पीएमपीएमएलची सोय होऊन तालुक्यात सर्वत्र बस जात आहेत. त्यासाठी बसचे जाळे विणून हजारो नागरिकांचा प्रवास सुखकर करणारे बाबा एक जनमान्य नेतृत्व झाले आहे. पुणे ते पौड, पुणे ते माले, पुणे ते काशीग कमान, पुणे ते कोळवण, पुणे ते बेलावडे, पुणे ते मुगावडे, पुणे ते कातरखडक, पुणे ते भादस अशा बसेसचे त्यांनी मुळशी तालुक्यात जाळे निर्माण केले आहे.
डोंगर खोऱ्यामध्ये राहणारे धनगर बांधव व आदिवासी बांधवांच्या वाड्यावर वीज पोहचवणारे म्हणून बाबा कंधारे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा १३,८५६ कुटुंबांना मोफत लाभ मिळवून दिला. कोरोनात गरजूंना ३००० (तीन हजार) कोरोना किटचे वाटप केले. तसेच कोरोना काळामध्ये आरोग्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी ताई, आशाताई, बचत गटाचे अध्यक्ष व सचिव तसेच ग्रामपंचायत महिला कर्मचारी अशा दीड हजार महिला भगिनींना कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबाचे मोफत दर्शन देवदर्शन घडविले.
मुळशी प्रादेशिक टप्पा एक व दोन पाणीपुरवठा योजनेकरीता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मुळशी तालुक्यातील पन्नास गावांसाठी ६६० कोटीचा निधी मंजूर करून घेतला. भविष्यात मुळशी तालुक्यातील लाखो लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या योजनेच्या माध्यमातून सुटणार आहे. आंबवणे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाडी-वस्ती वरती कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून विकास कामे केली आहेत. कोरोना काळामध्ये देखील बाबा मुळशी तालुक्यातील जनतेला सुमारे तीन हजार अन्नधान्य किट वाटप करुन एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य वितरण करणारे बाबा कंधारे मात्र प्रसिद्ध पासून लांबच राहिले आहेत. बाबा आता देखील कुंजीर तालीम व आनंद हेल्थ क्लब येथे व्यायामाचा दररोज सराव करत असतात.
बाबा कंधारे यांनी कोंढावळे गावातील काळभैरवनाथ -जोगेश्वरी माता, विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर यांचे काम करुन घेतले आहे. संपुर्ण मुळशी तालुक्यामध्ये बांधकाम नसेल असे मंदिर बांधण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. या मंदिरासाठी तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी दादा आणि ताईंकडे करणार असल्याचे बाबा कंधारे यांनी सांगितले.
अशा या समाजसेवी, आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!