मावळ I झुंज न्यूज : भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ यांचा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी या ठिकाणी नुकताच उत्साहात पार पडला. तसेच वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी दुर्गाच्या द्वाराचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक कडजाई मातेच्या मंदिरा पर्यंत काढण्यात आली. त्या कडजाई मातेची आरती करून पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
दरम्यान गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांचा या ठिकाणी ऐतिहासिक पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्थळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
इंदुरी दुर्गाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे वाचन यात करण्यात आले. या कामात सर्व मावळ वासीयांनी सक्रिय सहभाग घेण्यासाठी सर्वाना आवाहन करण्यात आले.