भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे केले आवाहन
पिंपरी I झुंज न्यूज : धर्मांतरावर आधारित ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे केले आवाहन त्यांनी केले आहे.
चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. सिनेमागृहात गुरूवारी, दि. ११ मे रोजी ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शोचे नियोजन केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन असून, चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह आहेत, यांनी दाखवलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांच्या चिंतन करायला लावणारी आहे. सर्व धर्मातील निरपराध महिलांना कधी प्रेमाने, तर कधी धमक्या देऊन कसे इस्लाम धर्मात धर्मांतरित केले जाते हे दाखवले आहे. यासाठी समाजप्रबोधनाचा भाग म्हणून आमदार लांडगे यांनी या चित्रपटाचे तीन शो मोफत आयोजित केले आहेत.
आमदार लांडगे म्हणाले की, धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता- भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात, अशी आमची भावना आहे. राज्य सरकारने धर्मांतर, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही आम्ही विधानसभा अधिवेशनात केली होती.
“लव्ह जिहाद आणि धर्मांतर या लग्नाचे आमीष, प्रेमाचे आमीष किंवा नोकरीचे आमीष दाखवून मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात. ही बाब समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मध्यतंरी लव्ह जिहाद आणि धर्मांतर, गोहत्याबंदी बाबत शहरात विराट मोर्चा काढण्यात आला होता. आळंदीत एक धर्मांतराचा प्रकार आम्ही उधळून लावला होता. आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आम्ही हा शो मोफत ठेवला आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.