चाकण I झुंज न्यूज : खेड, येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गंगाराम महादेव डामसे हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त राक्षेवाडी ग्रामस्त व महाळुंगे केंद्राच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
डामसे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा आलेख भाऊराव पांडे , ज्ञानेश्वर मोकाशी , दत्तात्रय भालचिम, मधुकर छत्रीकर , ईश्वर राक्षे , अमोल पाचपुते या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उलगडला.
वासुली, भालसिंगवाडी, वांजाळे, तिन्हेवाडी , पठारवाडी, व राक्षेवाडी अशा अनेक गावात त्यांनी अध्यापनाचे काम करून हजारो विद्यार्थी घडवले. कुशल व्यवस्थापक, उत्तम प्रशासक व आदर्श शिक्षक म्हणून जनमानसात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. यावेळी त्यांचे विद्यार्थी ,आप्तेष्ठ, मित्रपरिवार, शिक्षक बंधू भगिनी व ग्रामस्तांच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
कार्यक्रमास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, विस्तार अधिकारी श्रीरंग चिमटे , केंद्र प्रमुख राजीव आंबेकर , झंपू ताते , रामदास लाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतिभाताई राक्षे ,उपाध्यक्ष शाम राक्षे , शिक्षक नेते शांताराम नेहेरे , राजेश कांबळे, तानाजी म्हाळुंगकर, नारायण करपे, जालिंदर दिघे , संतोष कुंभार , बबन गावडे , सुरेश आदक , अनिल तळपे , रामचंद्र शिंगाडे , शिवाजी डुंबरे , संदीप जाधव , संजय राळे ,दत्तू राक्षे , बाळू शिंदे , प्रताप आडेकर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोहर मोहरे व साधना घाटकर यांनी केले तर आभार संतोष टेमगिरे यांनी मानले . यावेळी सर्वासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते .