सोलापूर I झुंज न्यूज : सोलापूर जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबण्यात आला. आई- वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम होता. गावातील 150 कुटुंबातील 300 आई-वडीलांचा रथात बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे पाद्य पूजन करण्यात आले. या शोभायात्रेमध्ये गावातील हजारो नागरिक सहभागी झाली. सर्वांनी आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जन्म देऊनी कृतार्थ केले । प्रेमाने पालन-पोषण केले । कमी काही ना पडू दिले । उत्कृष्टपणे आम्हा घडविले, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कोणी केला उपक्रम
सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील पोथरे येथील हनुमान भजनी मंडळाच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला. आई- वडिलांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला. त्यात गावातील 150 कुटुंबातील 300 आई-वडीलांचा रथात बसवले. त्याचे पाद्य पूजन केले. त्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाले.
हरिनाम सप्ताहात उपक्रम
पोथरे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. आई- वडिलांची पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथ मंदिर येथून आई- वडिलांना ट्रॅक्टरमध्ये बसवण्यात आले. त्यांच्या मुलांकडून पूजा करून तीन प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होत पुष्पहार देत सन्मान करण्यात आला.
एकाच वेळी ३०० आई-वडिलांची काढली मिरवणूक#Father #mother pic.twitter.com/1i5GZp3G4s
— jitendra (@jitendrazavar) April 15, 2023
गायनाचार्य गंगाधर शिंदे म्हणाले, ‘भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केल्याने जगाचे दैवत पंढरीचा विठ्ठल स्वतः पुंडलीकाला भेटण्यास आले. त्यांची सेवा किती श्रेष्ठ आहे. त्यामुळेच आम्ही आई-वडिलांविषयी कृतज्ञता सोहळा साजरा केला.’
“मुल झाले म्हणजे आई-वडिलांचा आनंद गगणात मावत नसतो. मग त्या मुलासाठी जे जे शक्त त्यापेक्षा कितीतरी जास्त करण्याचा प्रयत्न आई-बाबा करतात. आई-बाबांनी केलेल्या प्रेमाची कधीही कोणी परतफेड करु शकत नाही. परंतु त्यांचे ऋण एखाद्या प्रसंगातून व्यक्त करण्याची ही कल्पना होती. या कल्पनेचे परिसरातूनही चांगले कौतूक होत आहे.