– आठवीच्या निरोप समारंभाच्या वेळी वाबळेवाडीतील विद्यार्थी भावूक
पुणे I झुंज न्यूज : आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आज इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी मनोहर परदेशी तर विशेष अतिथी दत्तात्रय वारे गुरुजी उपस्थित होते. यावेळी कवी मनोहर परदेशी यांनी मुलांच्या भावना आपल्या कवितेतून सादर करताना म्हणाले,
“सर दुर्गुणांनी भरलेले काळीज आमचं,
तुम्हीच साफ केलं,
शेकडो चुका केल्या आम्ही,
सर तुम्हीच माफ केलं.!
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसह व्यासपीठावरील मान्यवरही भावुक झाले. विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकाला अश्रू अनावर झाले. त्यांच्या भावनांचा बांध परदेशी सरांच्या कवितांनी फुटून गेला.
त्याचबरोबर शाळेचे महत्व सांगताना ते म्हणाले,
“स्वप्नांना पंख लावते शाळा
आकाश कवेत घ्यायला शिकवते
बुध्दीवंताची पेरणी करुन
शाळा रोज सोनं पिकवते·
या ओळीतून सरांनी शाळेचे महत्व विशद केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना विचार व्यक्त करुन वाट मोकळी करून दिली. यावेळी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले. क्रीडा शिक्षक पोपट दरंदले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्रापूर नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी मनोहर परदेशी तर विशेष अतिथी म्हणून दत्तात्रय वारे गुरुजी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, सुनिल पलांडे, एकनाथ खैरे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ, अंगणवाडी ताई सीता मिसाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, माजी अध्यक्षा सुरेखा वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्या मोहीनी मांढरे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, काळूराम वाबळे, आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक सचिन बेंडभर यांनी केले. प्रास्ताविक तुषार सिनलकर तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी मानले.