संकलन : बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर, निगडी, पुणे – ४११०४४
यंदा ४ एप्रिल २०२३ ला महावीर जयंती आहे. जैन धर्म हा भारतातील एक जुना धर्म आहे. भारतभर त्यांचे अनुयायी पसरलेले आहेत. जैन धर्माचे ते आद्यप्रवर्तक मानले जातात. ते २४ वे तीर्थंकर होते. जैन धर्माचे पुनरुत्थान त्यांनी केले.
इ. स.पू.५९९ ला बिहार मधील मुझफ्फरपूर जवळ वैशाली साम्राज्य होते. इक्ष्वाकु वंशातील राजा सिध्दार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर राज्याची प्रगती आणि विकास झाला म्हणून त्यांना वर्धमान म्हटले गेले.
वयाच्या ३० व्या वर्षी ऐहिक सुखांचा, ऐश्वर्याचा, राजपाटाचा त्यांनी त्याग केला. १२ वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह ही पंचमहव्रते त्यांनी मांडली.अध्यात्मिक मुक्ती साठी याची गरज आहे असे म्हणत. अनेकांतवाद, स्यद्वाद हे सिध्दांत महावीरांनी आपल्या शिष्यांना सांगितले.
महावीरांनी त्रिरत्ने सांगितली. ती म्हणजे सम्यगदर्शन (“योग्य श्रद्धा”), सम्यज्ञान (“योग्य ज्ञान”), आणि सम्यकचरित्र (“योग्य आचरण”) असे समजले जाते. तिघांपैकी एक इतरांशिवाय अस्तित्वात असू शकत नाही, आणि हे सर्व आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत.
भगवान महावीर यांचे शिष्य इंद्रभूती गौतम यांनी त्यांची शिकवण लिहून काढली. त्या ग्रंथांना आगम म्हटले जाते. भगवान महावीर यांचे प्रथम ११ शिष्य होते. त्यांना गंधर म्हटले जाते. उत्तर पुराणानुसार, महावीर स्वामींनी सात तत्त्वे, सहा पदार्थ, जग आणि मोक्षाची कारणे आणि त्यांची फळे यांचे वर्णन समवसरणात, नया इत्यादीद्वारे केले होते.
जैन ऋषी, आर्यिका महावीरांनी सांगितलेल्या पाच नवसांचे पूर्ण पालन करतात, म्हणूनच त्यांचे महान व्रत आणि श्रावक, श्राविका पालन करतात, म्हणून त्यांना अनुव्रत म्हणतात. जैन ग्रंथांमध्ये दहा धर्मांचे वर्णन आहे. या दहा धर्मांचे दहा दिवस पर्युषण उत्सवात चिंतन केले जाते याला दहा चिन्हे देखील म्हणतात.
वयाच्या ७२ व्या वर्षी इ. स. पू.५२७ ला त्यांचे परिनिर्वाण पावा पुरी ,बिहार येथे झाले. त्यांनी अहिंसेचा संदेश दिला म्हणून ते वंदनीय, पूजनीय आहेत.
(संदर्भ-विकीपिडिया)