पिंपरी I झुंज न्यूज : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत चऱ्होली, रावेत व बोर्हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही दि . १७ / ० ९ / २०२० रोजी संपुष्टात येत होती. परंतु नागरिकांची गरज पाहता हि मुदत पुढील १५ दिवस वाढविण्यात आली असून २ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज नागरिक भरू शकतात. त्यामुळे नागरिकांना दिलासा भेटला आहे.
“पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न याने ब – याच गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे . तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . तसेच सदर योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच र.रु .५००० / – चा डी.डी. देणे आवश्यक आहे .”
परंतु शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत आहे . या सर्व गोष्टींचाविचार करून शहराच्या महापौर उषा उर्फ़ माई ढोरे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. तथापि या सर्व गोष्टींचा विचार करून, अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेवून अर्ज भरण्याची मुदत दि . ०२ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.