चिंचवड I झुंज न्यूज : थेरगाव येथील श्री फाऊंडेशन व उद्योजक दिपक शुक्ला यांच्या तर्फे नुकताच समस्त उत्तर भारतीय परिवार आणि स्थलांतरित कामगारांसाठी होळी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात स्थलांतरित कामगार ज्यांचे कुटुंब त्यांच्या बरोबर नाही अशी लोक, थेरगाव-वाकड- काळेवाडी व इतर भागातील समस्त उत्तर भारतीय लोक व स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात अंदाजे 450-500 लोक उपस्थित होते.
उद्योजक दिपक शुक्ला व पदमजी पेपर प्रोडक्ट कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष कालिदास वाडघरे यांनी गणपतीच्या प्रतिमेला हार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर संगीतकार अशोक जाधव यांनी होळीचे गाणे गाऊन आलेल्या सर्व लोकांचे मनोरंजन केले, व नाश्ता-थंडाई-मिठाई चे सर्व लोकांनी लाभ घेत आनंद लुटला. या वेळी भरपूर लोकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून व कोरडा रंग खेळून आनंद घेतला.
या वेळी सिध्देश्वर दादा बारणे (मा. नगरसेवक, पिं-चिं, म.न.पा) व झामाताई बारणे (नगरसेविका, पिं-चिं, म.न.पा) यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले व कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वाना मार्गदर्शन करत होळीच्या शुभेच्छा दिले. समस्त उत्तर भारतीय लोकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच पदमजी पेपर प्रोडक्ट कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
तुलसी मानस मंडल, रामचरित्र मानस मंडल, विशाल मित्र मंडल, गणेश भाऊ मित्र परिवार, सदाशिव काॅलनी मित्र परिवार इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर श्री फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे, संदीप शिंदे, किरण साठे, प्रशांत जाधव, तसेच उद्योजक दिपक शुक्ला, रोहित शुक्ला, लंलन शुक्ला, गोविंद दुबे, पवन तिवारी आदिच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला.
या वेळी सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले. तसेच श्री फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित नागरिक यांचे आभार मानले.