पुणे I झुंज न्यूज : सकल मराठा महासंघ आयोजित भव्य शिवजयंती उत्सव २०२३ वर्ष 15 वे मराठा महसंघ चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयूर घारे देशमुख यांच्या मार्गदर्शना मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन युवक पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल उभे यांनी उत्तम रित्या केले होते. शिवजयंती निमित्त महाराष्ट्राची लोकाधारा, मुजरा हा लोक कलेचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचा असंख्य शिवभक्तांनी व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला
तसेच खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो महिलांनी कार्यक्रमात सहभाग होत आनंद लुटला. कार्यक्रमात कल्पना साठे यांनी मानाची पैठणी मिळवली तर पूनम शेडगे यांनी सोन्याची नथ मिळवली.
याप्रसंगी संजय जैन, हेमंत माळी, जयश्री घारे, श्रैया नांगरे, शालिनी चांदणे, पलवी गाडगीळ, वैशाली लवांडे, संदीप शेडगे, सम्राट चव्हाण, नरेंद्र पायगुडे. यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयूर घारे व युवक अध्यक्ष राहुल उभे यांनी महिला व तरुण तरुणींना व्यवसाय मार्गदर्शन व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार व नोकरदार तयार न करता उद्योजक घडविण्यावर भर देणार अशी घोषणा केली व कार्यक्रमाचा समरोप झाला.