आचार्य आनंदॠषिजी स्कुलचे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न
कासारवाडी I झुंज न्यूज : कासारवाडी येथील आचार्य आनंदॠषिजी इंग्लीश मिडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसम्मेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आचार्य अत्रे नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. या वेळी मुख्य अतिथि म्हणून 22 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवि प्रा चंद्रकांत वानखेडे आणि विशेष अतिथि म्हणून ग्लोबल इंटरनेशनल स्कुलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ स्वप्नाली धोका , व मराठी सिनेकलाकार संदीप साकोरे उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया होते.
यावेळी बोलताना प्रा वानखेडे म्हणाले कि, शाळेला कोणतेही अनुदान नसताना अतिशय कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचं फार महत्वाच काम समाजसेवेचा दृष्टीकोनातून प्रा. पगारिया यांच्या नेतृत्वाखाली संस्था करीत आहू ही प्रशंसनीय बाब आहे.
यावेळी संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी अनिल कटारिया , नयन भंडारी, महावीर कुवाड , कल्पेश पगारिया ,किरण भंडारी ,शांतीलाल ओसवाल तसेच विशेष अतिथि ,माजी नगरसेविका आशा धायगुडे , कवि शंकर आथरे ,प्रा सुरेखा कटारिया ,सुप्रिया सोळंकुरे , लता पगारिया ,प्रेरणा कुवाड ,आदि मान्यवर मंचावर हजर होते.
यावेळी सिनेअभिनेता संदीप साकोरे आणि डॉ स्वप्नाली धोका यांनी ही विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सौ मेघना जोशी यांनी अहवाल वाचन केले. प्रा डॉ अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली व पर्यवेक्षिका सुलभा मुंगी यांनी आभार मानले. सौ सुनिता काळे यांनी सुत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षिकांनी अतिशय परिश्रम घेतले. पालकांनी सहकार्य केले.