चिंचवड I झुंज न्यूज : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानं चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावं चर्चेत असून अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादीचे मा. नगरसेवक मयूर कलाटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीतून काही जण इच्छुक असून, त्यात भाऊसाहेब भोईर, नाना उर्फ विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, यांची जास्त चर्चेत आहेत. मात्र या सर्वांमध्ये मयूर कलाटे बाजी मारणार असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राहुल कलाटे यांनी देखील या पोटनिवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र त्यांनी अद्याप पक्ष सांगितलेला नाही.