थेरगाव | झुंज न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने या सेवा सप्ताहात थेरगाव परिसरात प्रभाग क्रमांक २३ मधील बापुजीबुवा उद्यानात पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान राबवित वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला.
प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आदेश नुसार आणि आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुजा करून वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष काळुराम बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेवक कैलास बारणे नगरेविका अर्चना बारणे, नगरसेविका मनिषा पवार, सामाजिक कार्यकर्ते, तानाजी बारणे, सुलभा घोगरे, हनुमंत बारणे, देशमुख ताई आणि महापालिकेतील कर्मचारी व उद्यान विभाग उपस्थित होता.
“जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित, अदिवासी व शेतकरी यांच्यासाठी देवदूताप्रमाणाने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १४ ते २० सप्टेंबर दरम्यान वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्तीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.”