शिरूर I झुंज न्यूज : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या यशानंतर नुकतेच जाहीर झालेल्या चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल तेवीस विद्यार्थी अ श्रेणीत, तर बारा विद्यार्थी ब श्रेणीत आणि दोन विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व कलाशिक्षक दीपक मोरे यांनी दिली आहे.
अ श्रेणी मिळविणारे विद्यार्थी : विद्याधाम विद्यालयातील आर्यन गाजरे अतिष बोऱ्हाडे वीरेंद्र पिंगळे, ईश्वर पिंगळे, सोहम नाणेकर, आर्यन नाणेकर, प्रविण गायकवाड , अर्थव ननावरे , मयूर ढगे, सुजित थोपटे, आयुष दंडवते, सार्थक तळोले, सोहम धुमाळ, पायल उकिडे , सिध्दी ढगे, तनुजा पुंडे, ज्ञानेश्वरी पुंडे, वैष्णवी खैरे, चैताली दाते, संचिता नरवडे, गौरी ढगे, सोहम मोरे, अर्थव नाणेकर या विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत यश मिळविले.
क श्रेणी पटकावणारे : समाधान भोसले, सार्थक खैरे, श्रेयश खैरे, प्रज्ज्वल धुमाळ, सिध्दी नाणेकर, गीता पुंडे, सिध्दी राक्षे, साक्षी खैरे, दीपाली वाघोरे, अनुजा नाणेकर, आदित्य खैरे, मयूर पुंडे, यांनी तसेच समिक्षा गोरडे, कुणाल भोर या दोघांनी क श्रेणीत यश संपादित केले.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दीपक मोरे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य अनिल शिंदे तसेच विद्या विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.