पुणे I झुंज न्यूज : इंदूर येथे नुकताच ‘भारत जोडो ५५ वा नीट इंडिया २०२२’ व होनेस्टी अवार्ड वितरण सोहळा पार पडला. यामध्ये लोणावळा येथील ऑक्सिलियम काॅन्व्हेंट हायस्कूलची १० वीची विद्यार्थीनी नंदिका धनंजय कामत हिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यभरात केवळ ९ शाळांच्या विद्यार्थीनींना हा होनेस्टी अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये नंदिता हिचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी फादर वर्गिस, एनी पवार, फादर जोकब, फादर आईसेस, आयपीएस अधिकारी अनुराधा शंकर, श्रीमती नितु जोशी, डाॅ. भरत छापरवल, नितीश बरोळे, अंकिता बॅनर्जी, आशिष त्रिवेदी, डाॅ. लिमा धर, मार्गरेट गोवरीनाथ, फादर जेम्स आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला फुटेडोंं, शिक्षिका व पालक यांनी प्रेरणा दिल्यामुळे हे शक्य झाले, असे नंदिका कामत हिने सांगितले. या पुरस्कारबद्दल नंदिका हिचे शाळा तसेच परिसरात कौतुक होत आहे.