मारुंजी I झुंज न्यूज : मुळशीतील मारुंजी ग्रामपंचायत शेजारी जखमी अवस्थेत सापडलेल्या सापाला वाईल्ड अँनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन संस्थेच्या सदस्यांच्या मोलाच्या सहकार्याने आणि डॉक्टर मार्फत उपचार देऊन तब्बल सहा दिवस सापाची देखभाल करण्यात आली. तसेच सापाची परिस्थिती सुधारल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडुन जीवदान देण्यात आले. वन्यजीवांवर असणारा हा जिव्हाळा पाहुण तालुक्यात त्या प्राणीमित्रांचे कौतुक होत आहे.
मारुंजी ग्रामपंचायत शेजारी जखमी अवस्थेत असलेला चार फुटाचा विषारी नाग येथील सुजाण नागरिकांच्या निदर्शनास आला होता. तात्काळ या घटनेची माहिती सुजाण नागरिकांनी वाईल्ड अँनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी संस्थेतील सर्परक्षकांना दिली होती. त्यानुसार तुषार जोगदंड, श्रीनिवास देवकाते, अजित भालेराव तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जखमी अवस्थेतील साप रेस्क्यू करून संस्थेतील मुख्य सदस्य तुषार पवार, शेखर महाराज जांभुळकर, गणेश भुतकर यांना माहिती देत त्या सापावर उपचार करावे यासाठी त्वरित याची माहिती RESQ CHARITABLE TRUST PUNE UNIT यांना देण्यात आली त्यानंतर जखमी साप त्यांच्या ताब्यात देण्यात आला. जावपळस ६ दिवस त्या सापाची देखभाल करण्यात आले. व त्याची परिस्थिती सुधारतात त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.
साप सुखरूप निघुन जात असताना सर्पमित्रांना आनंद तर झालाच पण आपण केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱयावर दिसत होते. रहिवासी भागात साप आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात भीतीपोटी तसेच अज्ञानाअभावी अजुनही साप मारण्याचे प्रकार घडून येतात परिसरात कुठल्याही प्रकारचे वण्यजीव आढळल्यास 24 तास कधीही संस्थेशी संपर्क साधावा असे आव्हान प्राणीमित्रांनी केले.
पिंपरी चिंचवड विभाग : 9011883000 / 9960355522 / 9970668886.
पुणे विभाग : 9860181534 / 8087348348