पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते कोविड-१९ रूग्णांकरिता उभारण्यात आलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरला भेट दिली असताना त्यांना निदर्शनास आलेल्या त्रुटी बाबत मनपा आयुक्तांना राजू मिसाळ यांनी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रूग्ण शहरातील वेगवेगळया भागात रोज हजार बाराशेच्या घरातर सापडत आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने १७ ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे राज्य शास्नानाने आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जॅंम्बो हाॅस्पिटल तर ऑटो क्लस्टर या ठिकाणच्या रुग्णांच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे येत होत्या. त्यामुळे या सेंटर भेट दिली असता कोविड सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
रूग्णांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. मिळालेले जेवण निकृष्ट दर्जाचे आहे त्याच प्रमाणे या सेंटरच्या एका कोपऱ्यात बायो मेडिकल वेस्टज (पी.पी.ई.किट, मास्क, ग्लोज इ.) चार दिवसापासून पडून असल्याचे तेथील रुग्णांशी बोलताना समजले सदरची बाब अतिशय गंभीर आहे.
कोरोना बाधित रूग्णांना सकस आहार देण्याचे शासनाचे निर्देष आहेत. तरी सुध्दा त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविले जात आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची प्रकृती अजून बिघडू शकते. त्यामुळे सर्वच कोरोना कोविड सेंटरवरील रूग्णांना सकस व वेळवर चहा, नाश्ता व जेवण देण्याचे निर्देश देण्यात यावेत. त्याच प्रमाणे बायो मेडिकल वेस्टज् त्वरीत कोविड सेंटरवरून उचलण्यात यावे. असे ही दिलेल्या निवेदनामध्ये राजू मिसाळ यांनी म्हटले आहे.