पुणे I झुंज न्यूज : अखिल शिवाजीनगर गावठाण शिवजयंती महोत्सव समिती, पुणे आणि एच.डी.एफ.सी बँक, मॉडेल कॉलनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच श्री शिवाजी व्यायाम मंडळ कबड्डी संघाच्या मैदानावर मुक्ताई रक्तपेढी यांच्या मार्फत रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात एकुण १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री यशवंतराव भुजबळ (चेअरमन पी.डी.सी.ए), श्री.बाळासाहेब बोडके (मा.अध्यक्ष स्थायी समिती, पुणे. म.न.पा.) आणि श्री.बाप्पूसाहेब भेगडे (उप-चेअरमन संत तुकाराम महाराज साखर कारखाना) यांच्या हस्ते करण्यात आले.
आज संपुर्ण पुणे शहरात अनेक रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी एच.डी. एफ.सी.मॉडेल कॉलनी, पुणे बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री.समीर देशमुख, श्री.तुषार करंजकर, श्री.निलेश प्रभू, श्री.संदीप औटी,श्री.प्रवीण खुटवड, श्री.अभय जोशी, इ.मोलाचे सहकार्य लाभले.
अखिल शिवाजीनगर गावठाण शिवजयंती महोत्सव समिती, पुणे यांचे श्री.निलेश इंगवले, श्री.मंदार बहिरट, श्री.प्रशांत धुमाळ, श्री.रोहित तेलंग, श्री. सौरभ भिलारे, श्री.रोहित सांडभोर यांनी संपुर्ण शिबिराचे यशस्वीपणे नियोजन केले.