(प्रतिनिधी : सुरंजन काळे)
आंबेगाव I झुंज न्यूज : मुंबईवरील २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील शहिद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, मेजर संदिप उन्नीकृष्णन यांना घोडेगाव पोलिसांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
घोडेगांव पोलीस स्टेशनच्या वतिने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मानेसहाय्यक पोलीस निरिक्षक किरण भालेकर, पोलीस उपनिरिक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते शहिद अधिकारी आणि जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. फौजदार नवनाथ वायाळ, सहाय्यक फौजदार रविंद्र सुरकुले, पोलीस नाईक, माणिक मुळुक, धोंडु मुठे, सरला सुरकुले, छाया काळे, स्वप्निल कानडे हे उपस्थित होते.