(प्रतिनिधी : संदीप घोरपडे)
माढा I झुंज न्यूज : माढा तालुक्यातील उपळवटे गावचे इंजि. समाधान खुपसे यांना PMFME योजनेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्र शासन प्रणित,आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यामध्ये जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्य नोडल यंत्रणा – PMFME, कृषी आयुक्तालय पुणे. यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मान हा पुणे येथे कृषी विभागाच्या वतीने.आयोजित राज्यस्तरीय जिल्हा संसाधन व्यक्ती कार्यशाळेत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी खुपसे यांच्या कामाचे कौतुक करत अन्य संसाधन व्यक्तींना हि योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यापर्यंत पोहचवावी असे आव्हान केले. त्याचबरोबर सुभाषजी नागरे, संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन तथा, राज्य नोडल अधिकारी- PMFME, यांनी DRP यांची भूमिका समजावून सांगत असताना योजना व योजने संदर्भातील माहिती देत श्री. खुपसे यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
याप्रसंगी श्री. समाधान खुपसे पाटिल आभार मनोगत व्यक्त करताना श्री सुभाषजी नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य देशात अव्वल आल्याचे नमूद करत सदर योजनेत काम करीत असताना श्री.श्रीहरी बाबतीवाले उपकृषी संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन श्री बाळासाहेब शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर, श्री रवींद्र कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. मोरे उपसंचालक कृषी, सोलापूर श्री. पठाण तांत्रिक अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे असे सांगितले.