पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ काही महिन्यांवर आली आहे. त्या दृष्टीने शहरात तिनही विधानसभा मतदार संघातील बूत कमिटी अध्यक्ष व इतर महीला पदाधिकार्यांच्या नियुक्त्या नव्याने करण्याचे आदेश महीला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आले आहेत.
“पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिनही विधानसभा मतदार संघातून बूथ कमिटी आध्यक्ष पदासाठी अर्ज मागवले असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी मध्ये मोठ्या प्रमाणात फेर बदल करण्याचे ठरले आहे.”
त्यानूसार पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिनही विधानसभा मतदार संघातून अर्ज मागवले होते. राष्ट्रवादी महीला काँग्रेस शहर आध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश महीला कार्यकर्त्यांना दिले असल्याचे या वेळी शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांनी सांगितले.