पुणे I झुंज न्यूज : राजपुरोहित फिल्म्स च्या वतीने निर्मित होणाऱ्या विनोदी रोमँटिक लव लवर झिंदाबाद या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर व संगीत अनावरण सोहळा प्रमुख मान्यवर, कलाकार यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, रेश्मा सोनवणे यांच्या सुमधुर आवाजातील आणि सचिन अवघडे यांनी दिलेल्या संगीताचे आणि पोस्टरचे आमदार चेतन तुपे पाटील, अ भा म चित्रपट महामंडचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या शुभ हस्ते अनावरण झाले.
याप्रसंगी नाट्य निर्माते दत्ता दळवी, निर्माते संघमित्रा गायकवाड, राजेंद्र तुपे, दौलतसिंघ राजपुरोहित उपस्थित होते. चित्रपटाची मुख्य तारका नेहा तनपुरे हिचे आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चित्रपटाची इतर कलाकारांची यादी गुलदस्त्यात आहे असे दिग्दर्शक भरत महाडिक यांनी उदगार काढले, उपस्थित रसिकांचे नृत्य नाट्य गीतांनी मंत्रमुग्ध केले सर्व कलाकार यांचे सन्मान मा मेघराज राजेभोसले यांनी केले.