थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव येथील शिव कॉलनी समोर असलेल्या लाईट च्या खांबाला अडकलेल्या कबुतराला पशु प्राणीमित्र डॉ नगरकर यांच्या तप्तरतेने जीवदान मिळाले आहे.
शिवकॉलोनी परिसरात लाईटचे खांबाला एक कबुतर मांजला अडकले होते. ते दृश्य निदर्शनास येताच नागरिकांनी फायर ब्रिगेड गाडीला फोन केला मात्र गाडी येण्यास उशीर झाला. त्याअगोदरच परिसरातील पशु व प्राणीमित्र डॉ. नगरकर घटनास्थळी पोहचताच त्यांनी तत्परता दाखवत पीसीएमसी एमइसीबी चे खराडे साहेब याना फोन करून सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर 10 मिनिटातच गाडी घटनास्थळी पोहचली आणि कबुतराला सुरक्षित मोकळे करण्यात आले.
पँथर आर्मी सचिव महाराष्ट्र राज्य डॉ नगरकर यांच्या तत्पर प्रयत्नामुळे कबुतराचा जीव वाचला. आजपर्यंत अनेक पशु पक्षांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.