पिंपरी : पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस कै संतोष पवार व राज्यातील १३ दिवंगत पत्रकारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, संतोष पवार व माझे जवळचे संबंध होते. त्यांची पत्रकारिता ही समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देणारी होती. त्यांच्याबाबतीत उदाहरण देताना म्हणाले, एक वेळेस ते सकाळी पुण्यामध्ये आले व त्यांनी मला कॉल केला की तुम्हाला एका तासामध्ये पुण्यात यावं लागेल. मी अवाक झालो रायगडला असणारे संतोष पवार आज सकाळीच पुण्यात कसे काय ! नंतर मी पुण्यात गेलो आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या बाबतीत एक प्रशिक्षण होतं ते पूर्ण करून दिवसभर त्यांच्या आणि माझ्या चर्चा झाल्या यातून एकच दिसून येतं की ते किती हजरजबाबी व चांगले व्यक्तिमत्व होत.
“यानिमित्ताने गोरे यांनी पत्रकारांच्या समस्या व व्यथा मांडल्या. पत्रकारांना आव्हान करतानाच ते म्हणाले, पत्रकारांनी आपल्या घरच्यांचा विचार करून पत्रकारीता केली पाहिजे. पुण्यातील मृत्यू पावलेल्या पत्रकार रायकर मोठ्या चैनल ला काम करत होते. त्यांची ओळख राजकीय व प्रशासन या क्षेत्रात होती पण त्यांच्या कामी कोणीही आले नाही. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे असेेेही ते म्हणाले.”
यावेळी पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बानेवर, खजिनदार विनय लोंढे, कार्यकारिणी सदस्य, बाबू कांबळे, सीताराम मोरे, सूरज साळवे ,रामदास तांबे, मदन जोशी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.