पुणे I झुंज न्यूज : पुण्यातील ताज ब्लू डायमंड येथे डाॅ लता प्रकाश यांनी लिहिलेल्या ‘माय लोटस माइंड ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे अधिकृत अनावरण डाॅ गजानन आर एकबोटे कार्याध्यक्ष , प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) व श्रिमती सुनीता कल्याणी(संचालक, कल्याणी ग्रुप) यांच्या हस्ते झाले.
हा लघुकथा संग्रह असुन पुर्वकालीन मध्य प्रदेशातील आदिवासी जंगलापासून ते ऋषिकेशच्या वळणदार गल्यांपर्यंत, केंब्रिज विद्यापीठाच्या सभागृहापासुन ते अशांच्या ह्रदयांपर्यंत हे पुस्तक मानवी भाव-भावना व स्वप्ने, आशा व स्मृती हरवलेल्या व मिळालेल्या प्रेमाची विविध स्तरांवर छान गुंफण घालते. या कथा अशा सर्व तरुण आणि प्रौढांसाठी आहेत ज्यांना जगभरातील भारतीयांच्या दैनंदिन जीवन तुषारांचा रोमांचित करणारा ओलावा अनुभवाचा आहे.
या प्रसंगी बोलताना मा डाॅ एकबोटे म्हणाले, “या पुस्तकातील सर्व कथा उत्तम सामाजिक संदेश देणाऱ्या आहेत. डाॅक्टरी पेशातुन वेळ काढून अशी कलाकृती निर्माण करणे केवळ आध्यात्मिक बैठक असणाऱ्यांकडुन व सामाजिक जाणिव असणाऱ्यांकडुनच होते.” लेखीकेच्या लिखाणाचा दर्जा हा सुधा मूर्तीच्या लेखनाची आठवण करुन देतो असे डाॅ एकबोटे यांनी आवर्जुन सांगितले.
श्रीमती सुनिता कल्याणी यांनी पुस्तकाच्या उत्तम दर्जाचे कौतुक केले व पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या पुस्तक विक्रीतुन मिळणाऱ्या रकमेचा उपयोग मुलींच्या शिक्षण कार्यासाठी देण्याचा मनोदय लेखिका डाॅ लता प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाची सुरवात लेखिकेने रचलेल्या गणेशवंदनाने झाली व सांगता लेखिका व सौ मंगला चितळे यांनी गायिलेल्या पसायदानाने झाली. आभारप्रदर्शन श्री प्रकाश कोडलीकेरी (मॅनेजिंग डायरेक्टर, कल्याणी मॅक्सिआॅन व्हील्स प्रा ली) यांनी केले.