पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. परंतु आयुक्तांनी चालु केलेले अनेक प्रोजेक्ट अर्धवट राहुन ते केवळ स्वप्न ठरु नये यासाठी पाटील यांची राजकिय उद्देशातून झालेली बदली होल्डवर असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करुन आपला कामसू पणा दाखवुन देत समाजाने सतत दुर्लक्षित व वंचित ठेवलेला किन्नर समाज यांच्यासाठी एक पाऊल पुढे टाकत त्यांच्यासाठी महानगरपालिकेत सुरक्षारक्षक पासुन ते लेखनीक पदांच्या जागा उपलब्ध करून रोजी रोटी चालु केली. एवढेच नव्हे तर पालिका दवाखान्यात स्वतंत्र वार्ड उपलब्ध करून दिले. याबरोबर स्वच्छता अभियान राबवुन शहर स्वच्छ संदेश देऊन पहिल्या टप्प्यात देशात पहिल्या पाच मधे क्रमांक आला तर दुसऱ्या टप्प्यात प्रथम क्रमांकाच्या मार्गावर आहे.
वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट राबवुन अधिकाऱ्यांची मोठी टिम तयार झाली आहे. त्यामुळेच सर्व सामान्य नागरिक बदली झाल्याची बातमी पसरताच हळहळ व्यक्त होउ लागली होती. मात्र त्यांची झालेली बदली होल्डवर असल्याची माहिती समोर आली आहे.