चर्होली I झुंज न्यूज : रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून वैष्णवी फाऊंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सदस्यांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून व सीमेवरील जवानांना राख्या पाठवून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त ज्यांचा भाऊ परगावी आहे अशा महिला भगिनींना कडून वैष्णवी फाउंडेशनच्या सदस्यानी राख्या बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी बोलताना महिला सदस्यांनी सांगितले की, आयुष्यभर आपल्या रक्षणासाठी सैनिक रात्रं दिवस आपले संरक्षण करून देशाची सेवा करतात व वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम करते तसेच भावाप्रमाणे आमचं रक्षण करतात, जीवनदान देतात समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही आज वैष्णवी फाउंडेशन च्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करतोय.
याप्रसंगी वैष्णवी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर पा, श्री वाघेश्वर तापकीर, सामाजिक कार्यकर्त्या कविता बुर्डे, समिंद्रा तापकीर, पुनम तापकीर, दत्तात्रय बुर्डे, मिनाताई बडगुजर, अतुल पठारे आणि फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.