नेत्रदानाबाबत जनजागृती महत्वाची :आयुक्त राजेश पाटील
पिंपरी I झुंज न्यूज : पालिका प्रशासन व समाजातील नागरिकांनी नेत्रदानाबाबत सजगतेने पाहिले पाहिजे. नेत्रदान जनजागृती प्रक्रिया जन सामान्याना समजेल अशा स्वरुपात पुढे यायला हवी असे मत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
रक्षाबंधन निमित दृष्टिहीन बांधवांनी बनविलेल्या (आस्था) राख्या आज पिंपरी-चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्या हातावर बांधण्यात आल्या. चिंचवड येथील आस्था हँडीक्राफ्ट्स मधील दृष्टिहीन भागिनी व लायन्स क्लब च्या मान्यवरांनी महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्तांची भेट घेत रक्षाबंधन साजरे केले.इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.आयुक्तांच्या हातावर प्रेमाचा रेशिम धागा बांधत त्यांचे औक्षण करण्यात आले.दृष्टिहीन भागिनींना आयुक्तांनी पेढे भरवत त्यांच्या कार्याची माहिती घेतली.पुढील काळात प्रशासन विविध रोजगाराच्या संधी देईल अशी भेट त्यांनी दृष्टिहीन बंधवांना दिली.
या प्रसंगीआस्था हँडी क्राफ्ट्स चे अध्यक्ष पराग कुंकलोळ,लायन्स क्लब आकुर्डी चे अध्यक्ष अनिल भांगडीया,नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत – धर,नगरसेविका प्रज्ञा खानोलकर,नगरसेविका निकिता कदम ,प्राध्यापिका सविता नाणेकर,दिपा मुरकुटे,रोहिनी वारे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोखंडे,बालाजी सोनकांबळे आदि मान्यवर उपस्थिति होते.
शहरातील दृष्टिहीन बंधवांच्या रोजगार,शिक्षण व प्रशिक्षण या बाबत महापालिका प्रशासन पुढाकार घेईल अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.विविध क्षेत्रात दृष्टिहीन बांधवांना संधी उपलब्ध आहे.याचा फायदा घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.शहरात नेत्रदान जनजागृती साठी विशेष मोहीम उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.नेत्रदानाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी एकत्र कार्य व जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.शहरातील सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
आस्था राखी च्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तीनी बनविलेल्या राख्यांचे कौतुक केले.क्रांतिदिनाच्या निमित्ताने शाहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.माजी नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत – धर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.दृष्टिहीन विद्यार्थिनी प्रियंका धुमाळ हिने सर्वांचे आभार मानले.
“शहरातील दृष्टिहीन व्यक्तिना महापालिकेच्या वतीने रोजगार व वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे तसेच त्यांच्या व्यथा,वेदना व गरजा विचारात घेऊन विविध उपक्रम सुरु करावेत या साठीचे पत्र माजी नगर सेविका डॉ.सुलक्षणा शीलवंत-धर यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.