जम्मू I झुंज न्यूज : जम्मू पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका कट्टरवाद्याला अटक केलीय. तालिब हुसैन शाह असं त्याचं नाव आहे. जम्मू पोलिसांच्या माहितीनुसार, तालिब हा पूर्वी जम्मू भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचा सोशल मीडिया प्रभारी होता.
आता भाजपने मात्र ऑनलाइन सदस्यत्वाच्या प्रणालीला दोष दिला आहे ज्यामुळे लोकांना कोणत्याही पार्श्वभूमीची तपासणी न करता पक्षात सामील होऊ दिले जाते.
Hats off to the courage of villagers of Tuksan, in #Reasi district . Two #terrorists of LeT apprehended by villagers with weapons; 2AK #rifles, 7 #Grenades and a #Pistol. DGP announces #reward of Rs 2 lakhs for villagers. pic.twitter.com/iPXcmHtV5P
— ADGP Jammu (@adgp_igp) July 3, 2022
गेल्या रविवारी तालिब हुसैन शाह आणि त्याच्या साथीदारांना रहिवाशी भागातून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून एके-47, ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रास्त्रं जप्त केली.
“अटक केलेला तालिब हा कधीकाळी भाजपशी संबंधित होता, याबाबत भाजपचे प्रवक्ते आर. एस. पाठानिया म्हणाले की, “ऑनलाईन सदस्यता घेण्याचा हाच फटका आहे. कारण कुठलीही पार्श्वभूमी न तपासता तुम्ही सदस्यत्व देऊन टाकता.”
दरम्यान, कुठलाही मोठा घातपात करण्याआधीच जम्मू पोलिसांनी तालिब आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.