पिंपरी I झुंज न्यूज : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पिंपरी चिंचवड शहर शाखा यांच्या अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ६ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाटव खेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला पुंडलिक मते, राहुल शांताराम ढेबे, विजय शिंदे, अनिल जानकर, मनोज कुयटे, ओंकार सुतार, लीला शिंदे तसेच चाटव शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा पवार, केंद्रप्रमुख प्रकाश दळवी, रामचंद्र आखाडे (सा.कार्यकर्ते) तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या ६ शाळांना शैक्षणिक किट वाटप
(१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाटव
(२) जिल्हा परिषद प्राथमिक वाडी बीड शाळा
(३) जिल्हा परिषद प्राथमिक नांदिवली दंडवाडी
(४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदोशी
(५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर वाक्षेवाडी
(६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरारासाळगड पेठ शाळा
या सर्व शाळेंना विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने कीट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकू जानकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री खोपटे सर यांनी मानले.