पुणे I झुंज न्यूज : षटकोळी साहित्यप्रेमी विचारमंच समूह औरंगाबाद यांनी आयोजित केलेल्या दिनांक २६ जूनच्या राज्यस्तरीय कविसंमेलनात ॲड रामचंद्र पाचूनकर यांना साहित्य सामाजिक विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष संतोष साखरे गोकुळ बाल संस्कार संस्था ठाणे यांच्या व नितीन गायके कवी लेखक प्रकाशक यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी पुण्यातील कवी विजय जाधव, निगडी येथील जयद्रथ आखाडे, योगिता कोठेकर आणि इचलकरंजी येथील सुवर्णा पवार हे उपस्थित होते.
साहित्यिक सामाजिक स्तरातून व मित्रमंडळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी साप्ताहिक झुंज तर्फे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.