कवी : श्री. संतोष चव्हाण
९८५०१२७६९४
——————————————
हा सारा आटापिटा
केवळ सत्तेसाठी …
हि लाचारी ,हि दमदाटी
सारं काही सत्तेसाठी ….
केंद्रीय यंत्रणां मार्फत शिकविले
अनेकांना हिंदुत्वाचे धडे ….
मागे लागला इडी फेरा
आता जायचे कुणाकडे…..?
सत्तास्थापन झाली
मिळाली क्लीन चिट ….
जनता मात्र तुम्हांला
ठेवेल लक्षात अगदी फिट ….
जे त्यांचे नाही झाले
ते तुमचे काय होतील ….
तुमचं आमचं नाही पटलं
तर पुन्हा तिसरीकडे जातील …..
काय खरं काय खोटं ?
हे नागरिकांनी कळत नाही ….
जो तो आपलीच बाजू मांडतो
घात कधीही जनतेचा होत नाही ….
हा म्हणतो आमचेच सरकार
तो म्हणतो आमचेच सरकार ….
हे सारे कसे ?अरे राजकरण्यांनो
केवळ जनताच आहे तुमचा आधार ….
अनेकांच्या फाईल बंद
कोण ठरवत हो….?
आपल्या आपणच स्वतःला
सुप्रीम कोर्ट होता येत का हो …..?
मंत्र्यावरील असलेले आरोपांना
क्षणात मिळते क्लीन चिट …..
कोर्ट कचेऱ्या च्या फेऱ्या ऐवजी
एखाद्या पक्षात मिळावी सीट
करा कितीही घोटाळे ,भष्टाचार
साऱ्यांना आधार एखादा राजकीय पक्ष ….
प्रत्येक गोष्टीचा असतो अंत
यापुढे सुज्ञ मतदार ठेवेल तुमच्यावर लक्ष ……
अनेक भ्रष्ट नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणा
तुमच्यात असले की भ्रष्ट…..
तुमच्यातले आमच्यात
आले कि कसे होतात सारेच श्रेष्ठ ,,,,
ज्याचं पारडं जड
तिथं साऱ्यांचाच कल …..
ह्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची सत्ता
करील का हो देशाला सफल ….
करील का हो देशाला सफल ?
या कवितेमुळे कुणाच्या राजकीय भावना दुखावल्यास….कवी मनःपूर्वक दिलगिरी ….व्यक्त करतो !