मुंबई | झुंज न्यूज : विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली.
एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती माध्यमांच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकनाथ शिंदे आणि आमदार सूरतला नेमके पोहोचले कसे?
काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदेंसब सर्व आमदारांनी प्लानिंग करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतून सूरतला जाणाऱ्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यासोबतच, एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. सर्वात आधी 11 विधेयक रात्री वाजेपर्यंत सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंसोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मदत केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.
सूरतमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मदत केली. त्यासोबत सूरत पोलिसांनी रात्री याप्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.
नॉट रिचेबल आमदार
साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
मेहकरचे आमदार संजय गायकवाड
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
महाडचे भरत गोगावले
महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाचे केंद्र सुरतमध्ये
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 25 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.
एकनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका ?
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
रात्रीच्या सुमारास माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.