(प्रतिनिधी – प्रसाद बोराटे)
आळंदी I झुंज न्यूज : संत ज्ञानेश्ववर माऊलींचा पालखी सोहळ्याला २१ जूनला सुरुवात होणार आहे. या पालखीचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या वरखडे कुटुंबाच्या ‘सोन्या- माऊली’ बैलजोडीला मिळाला आहे.
फुरसुंगी येथील उद्योगपती आप्पासाहेब खुटवड यांच्या कडुन ही बैलजोडी तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांना विकत घेतली याची माहिती बैलजोडीचे मानकरी श्री.पांडुरंग तुकाराम वरखडे यांनी दिली.
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस पूर्ण करणाऱ्या पालखी सोहळ्याची लाखो वैष्णव वाट पाहतायेत.येत्या २१ तारखेला हा सोहळा सुरू होतोय.या सोहळ्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे बैल जोडीचा मान. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान पांडुरंग तुकाराम वरखडे व तान्हाजी आनंदराव वरखडे कुटुंबीयांना मिळाला आहे.
“आषाढी वारी पालखी सोहळ्याचा हा मान म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी असते. म्हणूनच या बैल जोडीला विशेष महत्व असते. ही बैलजोडी २ जुन रोजी आळंदीत दाखल झाली आहे.आळंदीत त्यांच्या शेतात त्यांच्या देखभालीची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या रोजच्या आहारात कडबा,मका,शेंगदाणा पेंड,वैरण इत्यादींचा समावेश करण्यात येतो.हा मान वरखडे कुटुंबियांना मिळाल्यानंतर ते मोठ्या श्रद्धेने बैलांची सेवा करत आहेत त्यामुळे वरखडे कुटुंबीय खुश आहेत.