मुंबई I झुंज न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा येत्या ५ जूनला होणार होता. पण त्याआधीच २० मे ला राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना यामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा हात आहे असा आरोप आता मनसे नेते करत आहेत.
मनसेकडून शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे एकत्र असेलेले फोटो शेयर केले जात आहेत आणि पवारांनीच अयोध्या दौऱ्यात अडथळा आणला असा आरोप मनसे नेत्याकडून केला जात आहे. तर मनसेच्या या आरोपला राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे नेत्यांचे आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा ट्विट करत करत निशाणा साधला आहे. “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
याबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होत होता, त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली जात होती, त्याची उदाहरण आता बाहेर येतायत. पवार साहेबांनी वक्तव्य केलं होतं, “एखाद्या नेत्याने परराज्यातल्या नेत्यावर वक्तव्य केलं तर परराज्यातले व्यक्तीने वक्तव्य केलं तर ते वक्तव्य राज्यविरीमुद्ध नसून व्यक्ती विरोधात आहे” ब्रजभूषणचे फोटो पवार साहेबांसोबत आहेत असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मनसेच्या आरोपांना राष्ट्रवादीचं प्रत्त्युत्तर
राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “काही लोक घाबरतात आणि त्या भीतीला लपवण्यासाठी फोटोंमध्ये कारणं शोधतात….” घाबरून अयोध्या दौरा रद्द केला, स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केले. “लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है” अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं खरं कारण
अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं खरं कारण राज ठाकरेंनी स्वतःच सांगितलं आहे. पुण्यातल्या गणेश कला क्रिडा केंद्र या सभागृहात २२ मे ला रविवारी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं खरं कारण सांगितलं होतं. राज ठाकरे तेव्हा म्हणाले होते की, राज ठाकरे म्हणाले की अयोध्या ट्रॅप आहे हे माझ्या लक्षात आलं. कारसेवकांना ठार मारले गेलं होतं. कार सेवकांच्या त्या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं होतं. मी अट्टाहास करुन गेलो असतो तर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हांला जेल मध्ये सडवलं गेलं असतं. मनसैनिकांवर केसेस होऊ नये म्हणून अयोध्या दौरा स्थगित केल्याचं राज ठाकरे म्हणाले होते.