पुणे I झुंज न्यूज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,राजर्षी छत्रपती शाहु महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची गती देण्यासाठी खऱ्या अर्थाने भाजप-शिवसेना युतीची नितांत गरज आहे.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांसोबत असलेल्या या हिंदुत्ववादी पक्षांनी आपआपली जबाबदारी ओळखून राज्य हितासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आनंद रेखी यांनी नुकतेच केले.
हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कणखर नेतृत्वामुळेच २५ वर्ष युती टिकली,रुजली. या नेत्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे युतीला जपले, जोपासले. पंरतु, काळालाही विकासासाठी भाग पाडणाऱ्या या समविचारी पक्षांची युती तुटल्यापासून राज्याची प्रगती मंदावला आहे. महाविकास आघाडी सारखा प्रयोगात्मक युतीतून सर्वसामान्यांची फसगत झाल्याचे चित्र उभे झाले आहे. अशात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रवासियांच्या मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन रेखी यांनी यानिमित्ताने केले.
“गेल्या दोन दशकांपर्यंत सोबत असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आता एकमेकांवर चिखलफेक करीत इतरांची करमणूक करणे बंद करावी. या पक्षांनी आता एकत्रित येवून विकास कामांचा धडाका लावला पाहिजे. अनेक कामे खोळंबली आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला आयती सत्ता मिळाली आहे. अशात ठाकरे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी पुन्हा गळाभेट घेवून नव्याने राज्यकारभार सुरू करावा.
राज्याच्या विकासाला वेग द्यावा आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांपासून त्यांना मुक्त करण्याचे आवाहन रेखी यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे दोन्ही समविचारी पक्ष एकत्रित राहील्यास राज्याचा कसा विकास होतो, हे भाजप-शिवसेना युतीच्या कारभारावरुन दिसून येते.त्यामुळे या दोन्ही पक्षांनी झाले-गेले विसरुन जात एकत्रित यावे,अशीच मतदारराजांची इच्छा आहे, असे रेखी म्हणाले.